867 षटकानंतर त्याने कारकीर्दीतील पहिला ‘नो बॉल’ फेकला अन् विकेट गमावली

2987

नुकतीच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ऐतिहासिक परंपरा असणारी अॅशेस कसोटी मालिका संपली. रविवारी अखेरच्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवला आणि मालिका बरोबरीत सुटली. संपूर्ण मालिकेमध्ये 774 धावांचा पाऊस पाडणारा स्टीव्ह स्मिथ आणि अष्टपैलू कामगिरी करणारा बेन स्टोक्सला संयुक्तपणे ‘मालिकावीर’ पुरस्कार देण्यात आला.

पाचव्या कसोटीत विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आव्हान होते. परंतु लिचच्या बळींचा चौकार आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या धारधार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 263 धावांमध्ये गारद झाला आणि इंग्लंडने 135 धावांनी विजय मिळवला. मिशेल मार्श आणि मॅथ्यू वाडे यांनी संघर्ष केला. वाडेने शतकी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मार्श आणि वाडे यांच्यात पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागिदारी झाली.

मार्श आणि वाडे मैदानात असताना 31 व्या षटकादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. वोक्सच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना मार्शच्या बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक बुर्नच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले, मात्र तिसऱ्या पंचांनी टीव्ही रिप्लेमध्ये पाहिले असता वोक्सचा पाय रेषेबाहेर पडल्याचे दिसले. यामुळे मार्शला नाबाद ठरवण्यात आले. विशेष म्हणजे वोक्सने कसोटी कारकीर्दी 867 षटकानंतर पहिला ‘नो बॉल’ टाकला होता.

michelle-marsh-cricketer

आपली प्रतिक्रिया द्या