रोहितच्या ट्वीटला विराटने दिलं मजेशीर उत्तर

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा बहुचर्चित विवाहसोहळा इटलीमध्ये पार पडला. टीम इंडियातील सदस्यांसह अनेकांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने केलेल्या एका मजेशीर ट्वीटचाही समावेश आहे. रोहितने विरूष्काला लग्नाच्या शुभेच्छा देत पुढील आयुष्यासाठी काही खास टिप्स दिल्या होत्या.

रोहितने आपल्या ट्वीटमध्ये, ‘विराट मी तुला हजबंड हँडबुक देईन. अनुष्का तुझे आडनाव बदलू नकोस’, असं म्हटलं होतं. रोहितच्या या ट्वीटला आता विराटनेही मजेशीर उत्तर दिलं आहे. ‘रोहित मला तुझ्या हजबंड हँडबुक सोबत तुझे ‘डबल हंड्रेड’ हँडबुकही दे’ असं विराटने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

रोहित शर्माने लंकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तडाखेबाज फलंदाजी करताना द्विशतकी खेळी केली होती. त्यामुळेच विराटने आपल्या ट्वीटमध्ये रोहितला ‘डबल हंड्रेड’ हँडबुक द्यायला सांगितलं आहे. याआधी रोहितच्या या ट्वीटला अनुष्का शर्मानेही उत्तर दिलं होतं.