काय महागले आणि काय स्वस्त झाले ?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. देशातील सामान्य जनतेसाठी हा अर्थसंकल्प आहे असे सांगणाऱ्या केंद्र सरकारने प्रत्यक्षात मात्र या अर्थसंकल्पातून नोकरदार जनतेला काहीही दिलेले नाही. काय स्वस्त झाले या सामान्य जनतेच्या प्रश्नावर अवघ्या काही वस्तू आहेत तर महाग झालेल्या वस्तूंची मात्र मोठी यादी आहे. यात सर्वसामान्यांना फक्त पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. डिझेल व पेट्रोलवरील उत्पादन शुल्क २ रूपयांनी कमी करण्यात आल्याने ते स्वस्त झाले आहेत. मात्र सामान्यांच्या वापरातील रिफाईन्ड ऑईल, दाढीचं सामान, औषधे, चपला, मेणबत्त्या, गाद्या, उश्या अशा काही वस्तू महागल्या आहेत.

स्वस्त होणार
१) प्रक्रिया न केलेले काजू किंवा सालासकट काजू
२)सोलार यंत्रणेत वापरण्यात येणारी सोलार टेम्पर्ड काच
३) वीट,टाईल्स
४) साधं आणि ब्रँडेड पेट्रोल
५) साधं आणि ब्रँडेड डिझेल

महाग होणार
१) फळांचे आणि भाज्यांचे विदेशी ज्यूस
२) अत्तरे, मेकअपचे सामान
३) त्वचेची देखभाल करणारी औषधे जसे सनस्क्रीन
४) दाढीचं सामान
५) डिओडरन्ट
६) गाड्या आणि गाड्यांचे सुटे भाग
७) चपला
८) हिरे आणि दागिने
९) पैलू न पाडलेले हिरे
१०) मोबाईल फोन आणि त्याचे भाग
११) मोबाईल चार्जर
१२) स्मार्ट वॉच
१३) एलसीडी, एलईडी आणि ओएलईडी टीव्ही आणि त्याचे भाग
१४) गाद्या,उश्या
१५) व्हिडीओ गेम्स
१६) भिंतीवर टांगण्याची घड्याळं
१७) खेळाचे साहित्य
१८) मेणबत्त्या
१९) पतंग
२०) गॉगल्स
२१) सिगारेट लायटर
२२) सुगंधित स्प्रे, एअर फ्रेशनर्स
२३) रिफाईन्ड ऑईल

आपली प्रतिक्रिया द्या