ऐश्वर्यावर मीम करणे पडले महाग, विवेकची कार्यक्रमातून हकालपट्टी

127
अभिनेता विवेक ऑबेरॉयने मोदींच्या बायपिकमध्ये मोदींची भुमिका बजावली आहे, निवडणुकीत तो स्टार प्रचारकही होता. तोसुद्धा मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार.

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्यावर वादग्रस्त मीम शेअर करणे अभिनेता विवेक ऑबेरॉय याला चांगलेच महागात पडलं आहे. चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर विवेकने मंगळवारी ट्वीटरवर माफीही मागितली. पण तरीही जनतेचा रोष कमी झालेला नाही. स्माईल फाऊंडेशन या खासगी स्वयंसेवी संस्थेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विवेक ऑबेरॉयला पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र विवेकने ओढावून घेतलेल्या वादामुळे आता या संस्थेने विवेकला त्यांच्या कार्यक्रमाला न बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

स्माईल फाऊंडेशनने याप्रकरणी एक निवेदन जाहीर केले आहे. विवेक ऑबेरॉयने सोशल मीडियावर जी पोस्ट टाकली. त्याचा आमच्याशी काहीही संबंध नसून त्यापासून आमची संस्था अलिप्त आहे. आमची संस्था महिला सशक्तीकरणाचे समर्थन करते. पण विवेक यांच्या विधानानंतर आमच्याशी त्यांची विचारधारा जुळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमातून विवेकला बाहेर काढत आहोत असं या निवेदनात म्हटले आहे. या संस्थेने ओडिशामधील फनी वादळाग्रस्तांना मदत करण्यासाठी निधी  उभारण्याचे ठरविले आहे. या निधी संकलनासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विवेकने वादग्रस्त मीमप्रकरणी सगळ्यांचीच जाहीर मागितली आहे पण तरीही अनेकजण त्याला ट्रोल करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या