मेल्यानंतर मला नवरी सारखे सजव, स्मिता पाटील यांची होती शेवटची इच्छा

1662

मरण येणार असेल तर त्याची चाहूल आधीच त्या व्यक्तीला लागते, असे बोलले जाते. बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटीलच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते. मरणाच्या काही दिवस आधीच स्मिता यांनी त्यांच्या मेकअप आर्टीस्ट दीपक सावंत यांना ‘मेल्यानंतर मला लग्नात जसे नवरीला सजवतात तसे सजव’ असे सांगितले होते. स्मिता यांचे ते वाक्य ऐकून दीपक यांना धक्का बसला होता पण काही दिवसांतच दीपक यांच्यावर स्मिता पाटील यांची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली.

स्मिता पाटील यांच्या बऱ्याचशा भूमिकांमध्ये त्या कमी मेकअप किंवा विना मेकअप दिसल्या आहेत. पण प्रत्यक्षात मात्र त्यांना मेकअपची आवड होती. दीपक सावंत यांनी एका चित्रपटात त्यांचा मेकअप केला होता. मेकअप केल्यानंतर स्मिता पाटील यांचे सौंदर्य अजून बहरून आले होते. त्यांनंतर त्यांनी दीपक सावंत यांना स्वत:चा खासगी मेकअप आर्टीस्ट म्हणून ठेवले होते.

”स्मिताला सजण्याची फारच आवड होती. ती बऱ्याचदा मला सांगायची की मी मेल्यानंतर मला नवरीसारखे सजव. स्मिताच्या अकाली जाण्याने आम्हाला सर्वांना जबर धक्का बसला होता पण तरिही तिच्या अखेरच्या क्षणी आम्ही तिला नवरीसारखे सजवले होते”, असे दीपक यांनी एका हिंदी वृत्तपत्राला सांगितले होते.

आज स्मिता पाटील यांचे निधन होऊन 31  वर्ष पूर्ण झाली आहेत. इतकी वर्ष उलटल्यानंतरही या हरहुन्नरी अभिनेत्रीच्या कामामुळे त्यांची आजही बॉलिवूडमध्ये चर्चा असते. वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या स्मिता यांनी एकाहून एक सरस भूमिका केल्या आहेत. त्यांनी राज बब्बर यांच्याशी लग्न होते. त्यानंतर पहिल्या बाळाच्या वेळी प्रसूती वेळी त्यांचे निधन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या