मृत्यूनंतर मला जग ‘असे’ दिसले…पुनर्जिवीत झालेल्या व्यक्तिने सांगितला अनुभव

स्वत:चा मृतदेह कधी कोणी पाहिला आहे का? असा प्रश्न जर विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’, असेच येईल; मात्र जगात अशी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तिला मृत्यूनंतर तिचा मृतदेह दिसत होता. त्या व्यक्तिने स्वत: त्याच्या मृत्यूची कथा जिवंत झाल्यावर सांगितली आहे. हे वाचून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या या व्यक्तिचे नाव फिल जेबल (58) असे असून ते फिटनेस इन्स्ट्रक्टर आहेत. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तांत्रिकदृष्ट्या मृत घोषित करण्यात आले होते. त्यावेळी 28 मिनिटांकरिता ते मृत झाले असल्याचा अनुभव त्यांनी घेतला.

बास्केटबॉल खेळताना त्यांना हा ह्रदयविकाराचा झटका आला होता. यावेळीच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी ते आपल्या शरीरातून बाहेर आले असून स्वत:चा देह वरून बघत असल्याचे त्यांनी पाहिले.

फिल यांनी यावेळी आलेल्या या अनुभवामुळे स्वतःचे वर्णन ‘मिरॅकल मॅन’ असे केले आहे. फिल सांगतात, ते तायक्वांदो प्रशिक्षक असून कोरियन मार्शल आर्ट्सही आहेत. नोव्हेंबरचा महिना होता. एकदा खेळत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळे त्यांचा मुलगा जोशुआने मदतीकरिता ऑफ ड्युटी नर्सला मदतीसाठी बोलावले. जेणेकरून सीपीआर देता येईल. फिलला थेट रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे तो तीन दिवस बेशुद्ध पडला होता. त्याची शस्त्रक्रिया झाली. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा सांगण्यात आले की, तो 28 मिनिटे तांत्रिकदृष्ट्या मृत होता.

फिलने सांगितले की, तो बास्केटबॉल आणि त्याच्या चाहत्यांचा ऋणी आहे. त्याच्या मदतीसाठी आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होते. तीन मुलांचे वडील असलेल्या फिलला एका आठवड्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले.

त्याने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘हे सर्व तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. ज्यामुळे तुम्ही पुढे जात राहता. माझ्या पुस्तकांमध्ये फक्त एकच महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे कठोर शारीरिक प्रशिक्षण घेणे, हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.

त्यानंतर फिल यांनी सांगितले की, मृत्यूच्या जबड्यातून परतल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा माझ्या दृष्टिकोनात बदल झाला. खेळातून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाविषयी विचार करू लागलो तसेच आपण ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल काळजी करतो, त्यांची चिंता करण्याएवढ्या त्या महत्त्वाच्या नाहीत शिवाय आपल्याला जे जमत नाही, याविषयी कोणालाही सांगू नका. फिलला आशा आहे की, त्याची ही कथा इतरांना प्रेरणा देईल. त्यांनी लोकांना एखाद्या जीव कसा वाचवता येईल, याविषयी प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही दिला आहे.