एका ट्विटमुळे टोयोटाचं ८१५६ कोटींचं नुकसान

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन

एका ट्विटचा असा काय फार परिणाम होणार, असं म्हणणाऱ्यांना ही बातमी त्याचं विधान बदलण्यासाठी विचार करायला लावेल. कारण एका ट्विटमुळे टोयोटा कंपनीला 8156 कोटींचं नुकसान सहन करायला लागलंय. हे ट्विट केलंय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी.

टोयोटा कंपनी मेक्सिकोमधअये नवा कारखाना सुरू करण्याचा विचार करत आहे. ह विचार जेव्हा ट्रम्प यांच्या कानापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी एक ट्विट केलं, ज्यात त्यांनी लिहलंय की “टोयोटा कंपनीने म्हटलं की कोरोला कार बनवण्यासाठी ते बाजा,मेक्सिको इथे प्लँट उभा करण्यार आहेत, शक्यच होणार नाही. प्लँट उभा करायचा असेल तर अमेरिकेत बनवा नाही तर वाढीव सीमा कर भरा”


त्यांच्या या विधानानंतर टोयोटा कंपनीचे शेअर धडाम करून आपटले, ज्यामुळे या कंपनीला 8156 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. आणि हे नुकसान फक्त 5 मिनिटांमध्ये झाल्याने टोयोटा कंपनी अधिकच चितेत पडली आहे.