ढोलताशांचा दणदणाट, घोषणांचा गडगडाट; दसरा मेळाव्याच्या परवानगी नंतर शिवसैनिकांचा जल्लोष

प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिली. न्यायालयीन लढाईत मिळालेल्या विजयानंतर शिवसैनिकांनी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी एकच जल्लोष केला. आवाsssज कोणाचा शिवsssसेनेचा या घोषणांच्या निनादात, ढोल ताशांचा गजरात आणि शिवसेनेच्या जयजयकाराच्या घोषणांनी विजयोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागताच मुंबईसह राज्यभरात शिवसैनिकांसोबतच अनेक सामान्य नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवले. शिवसेना भवन आणि मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला.