मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरूणाला टोळक्याची मारहाण

1222

मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला तीन ते चार जणांच्या टोळक्याने मारहाण केली. विमाननगर येथील म्हाडा कॉलनीच्या बसस्टॉपजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी मयुर पवार (वय 28) याने विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 19 मार्चला रात्री अकराच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर 19 मार्चला मैत्रिणीला भेटण्यासाठी रात्री साडेदहा वाजता विमाननगर परिसरात गेला होता. त्यावेळी यातील एका आरोपी बरोबर त्याचा वाद झाला. शिवीगाळ करत असल्याने वाद टाळण्यासाठी मयुर तेथून निघून गेला. घरी जाण्यासाठी तो म्हाडा कॉलनी येथील बसस्टॉप जवळ कॅबची वाट पाहत होता. त्यावेळी वाद झालेली व्यक्ती आणि त्याचे काही साथीदार तेथे आले. त्यांनी मयुरला शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोळ्यांखालचे हाड मोडले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांधले करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या