सेक्स स्कँडलच्या आरोपांमुळे राजपुत्राचा राजीनामा

1869

ब्रिटनचे राजपुत्र ऍंड्र्यु यांना बुधवारी सार्वजनिक जवाबदारीतून मुक्त करण्यात आले. एका महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळे ब्रिटनच्या राजघरण्यातील कामकाजावर मोठा परिणाम झाला.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे दुसरे पुत्र  ऍंड्र्यु यांच्यावर एका महिलेने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला. आपले वय तेव्हा फक्त 17 होते असेही या महिलेने सांगितले आहे. महिलेचा मित्र एप्स्टीनने तिला सेक्स गुलाम म्हणून ठेवले होते. एप्स्टीनवर नंतर मानवी तस्करीचा आरोप झाला. तुरुंगातच एप्सिटने आत्महत्या केली. सदर महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे एंड्रयू यांनी सांगितले आहे.

बर्किंगहॅम पॅलेसमधून एंड्रयू यांनी एक पत्रक जारी केले. सेक्स स्कॅंडलच्या आरोपांमुळे आपल्याला सार्वजनिक कार्य करताना अडचणी येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणून आपण स्वतःहून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या