अंगुरी भाभी फेम शुभांगी अत्रे मालिका सोडणार

सामना ऑनलाईन । मुंबई

टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या ‘भाभीजी घर पर हैं’ मधील नवी भाभीजी शुभांगी अत्रेदेखील मालिका सोडण्याच्या तयारीत आहे. मालिकेच्या टीमने नव्या भाभीजीचा शोध सुरू केला आहे. याआधी ‘अंगुरी भाभी’ची ही भूमिका साकारणारी शिल्पा शिंदे या भूमिकेमुळे खूप लोकप्रिय झाली होती. शिल्पा सध्या बिग बॉसच्या घरात आहे.

शुभांगी अत्रे राजकारणात प्रवेश करणार असल्यामुळे मालिका सोडत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शुभांगी एका राजकीय कार्यक्रमात सहभागी झाली होती.

bhabhiji_tv

आपली प्रतिक्रिया द्या