लोकसभेत राज्यातील दारूण पराभवानंतर आता भाजप महामंडळ वापटासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता

देशात लोकसभा निवडणुकांमध्ये अपेक्षित यश तर मिळालं नसल्यानं आणि जागांमध्येही घसरण झाल्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकांकडे आपलं लक्ष वळवलं आहे. मित्रपक्षांमध्ये निकालांनंतर धूसफूस सुरू आहे. तेव्हा पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजप काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे.

पुढील दोन दिवसांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षातील नेत्यासोबत राज्यातील मित्रपक्षांसोबत राज्य महामंडळांचे वाटप, विधान परिषदेतील रिक्त पदे भरणे आणि राज्यपाल नियुक्त आमदारांचा कोटा (या नियुक्तींशी संबंधित उच्च न्यायालयात खटला मागे घेतल्यानंतर) याविषयी बोलण्याची शक्यता आहे.