भाजपला दणका, तृणमूलच्या तक्रारीनंतर मोदींचे लस घेतानाचे होर्डिंग्स हटवण्याचे आदेश

pm-modi-takes-first-dose-of-coronavirus-vaccine-at-delhis-aiims

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी कोरोनाची लस घेतली. त्यानंतर त्यांचे लस घेतानाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या लस प्रकरणाचा फायदा पश्चिम बंगालमधील निवडणूकीत घेण्यासाठी भाजपकडून ठिकठिकाणी मोदींचा लस घेतानाच्या फोटोचे होर्डिंग्स लावण्यात आले होते. मात्र याबाबत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आयोगाने भाजपला सदर पोस्टर 72 तासात हटविण्याचे आदेश दिले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये अनेक पेट्रोल पंप, बस व रेल्वे स्थानकांवर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लस घेतानाचे होर्डिंग्ज लावलेले होते. तसेच कोविड 19 लसीकरणाच्या कागदपत्रांवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. हे सर्व प्रकार हे आचार संहितेचे उल्लंघन आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. निवडणूक आयोगाने येत्या 72 तासात सर्व होर्डिंग्स हटविण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही – प्रशांत किशोर

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून भाजप व तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलसाठी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे रणनिती आखत आहेत. प्रशांत किशोर यांनी या निवडणूकीत भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजयकीय रणनिती करणे सोडून देईन असे सांगितले आहे

आपली प्रतिक्रिया द्या