सोन्यापेक्षाही महाग आहे ‘या’ झाडाचे तेल, अत्तर, अगरबत्तीसाठी अरब राष्ट्रांमध्ये मोठी मागणी

जगात सोने, हिरे, मौल्यवान खडे आणि प्लॅटिनम अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची लाख-कोटींमध्ये किंमत आहे. मात्र तुम्हाला कोणी सांगितले की एखाद्या वृक्षाची किंमत कोट्यवधी रुपये आहे, तर… चकीत झालात ना. पण हे खरे असून सोन्याचे अंडे देणारे हे झाड हिंदुस्थानसह आशिया खंडात आढळते. या झाडापासून काढण्यात आलेल्या तेलाला लिटरमागे लाखो-कोटींची किंमत मिळते.

‘अगर’ असे या वृक्षाचे नाव आहे. या झाडातून काढण्यात आलेल्या तेलापासून सुगंधीत अत्तर तयार केले जाते. तसेच याच्या लाकडांचा आणि धलप्यांचा वापर अगरबत्तीसह अन्य सुगंधीत वस्तू बनवण्यासाठी केला जातो. चीन, जपान, कोरिया, इजित्पमध्ये या झाडाच्या लाकडांचा वापर धार्मिक कर्मकांडांमध्येही केला जातो. यासह कोरियामध्ये याचा वापर औषधी दारू आणि अरब राष्ट्रांमध्ये अत्तर बनवण्यासाठी केला जातो.

agarwood4

अगर या झाडाच्या लाकडापासून अत्तर काढण्यात येते. या वृक्षापासून तयार होणारे अत्तर जगात सर्वात महाग मिळते. याची किंमत लिटरमागे 50 लाखांपेक्षाही जास्त असते. विशेष म्हणजे हे लाकूड सडल्यानंतर त्यापासून अत्तर तयार केले जाते. तसेच यापासून बनवण्यात येणाऱ्या अगरबत्त्यांची किंमत प्रति किलो पाच लाखांपेक्षाही जास्त असते. अरब राष्ट्रांमध्ये यापासून तयार होणाऱ्या अत्तर आणि अगरबत्त्यांची मोठी मागणी असते. यासाठी लोक लाखो-कोटी रुपये मोजण्यासाठीही तयार असतात.

agarwood5

अनेक धार्मिक कार्यांमध्ये या लाकडाचा वापर केला जातो. बौद्ध, ताओ (चीन), ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मातील अनेक कार्यांमध्ये या झाडाच्या लागडाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक कारणांसाठी लाकडाचा, अत्तराचा आणि अगरबत्त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने याला ‘wood of the gods’ अर्थात ‘दैवी लाकूड’ असेही म्हटले जाते.

agarwood2

दक्षिण पूर्व आशियाच्या घनदाट जंगलांमध्ये आणि पर्वतीय भागात हे वृक्ष आढळून येतात. दक्षिण पूर्व आशियातील 15 देशामध्ये या झाडाच्या 26 जागी आढळून येतात. इंडोनेशिया, फिलिपिन्स, पापुआ न्यू गिनी, मलेशिया, ब्रुनई, कंबोडिया, सिंगापूर, थायलंड, चीन, बांगलादेश, भुतान, म्यानमार आणि लाओसमध्ये या झाडाच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात.

agarwood3

हिंदुस्थानमध्ये मुख्यत्वेकरून इशान्येकडील राज्यांमध्ये हा वृक्ष आढळतो. आसाम, त्रिपुरा, नागालँड, काचार आणि सिल्हेटच्या जंगलात हा वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्रिपुरा राज्याचा राज्यवृक्ष असणाऱ्या या झाडाचे सर्वाधिक उत्पादन आसाममध्ये घेतले जाते. आसामला ‘अगरची राजधानी’ असेही म्हटले जाते. राज्यात जवळपास एक लाखांपेक्षाही जास्त लोक अगर या वृक्षापासून तयार होणाऱ्या तेलाच्या व्यापारावर अवलंबुन आहेत.

agarwood

आपली प्रतिक्रिया द्या