गुहागर एसटी डेपोत वाहक, चालकांचं कामबंद आंदोलन

151

सामना ऑनलाईन । गुहागर

सकाळपासून गुहागर एसटी डेपोतील चालक आणि वाहकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचे पडसाद आता रत्नागिरी जिल्ह्यात बसण्याची शक्यता आहे. एका वाहकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कामबंद आंदोलन सुरू झालंय. तसेच कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप वाहकांनी केला आहे.

मंगळवारी संध्याकाळी गुहागर डेपोचे चालक आणि वाहक चिपळूण-गुहागर गाडी घेवून निघाले होते. मात्र रामपूर दरम्यान आपला विनयभंग वाहकांने करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एसटीमधून प्रवास करणा-या मुलीने केला आहे. त्यामुळे चिपळूण पोलीस स्थानकात वाहकाविरोधात अॅस्ट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. त्यामुळे गुहागर डेपोतील चालक वाहक संतापले आहेत आणि संपूर्ण गुहागर डेपोचं कामकाज आज बुधवार सकाळपासून बंद करण्यात आलाय याचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही उमटू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या