चंदगड नगर पंचायतीच्या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने सोमवार पासून उपोषण

18

सामना प्रतिनिधी । चंदगड

नगर पंचायतीच्या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी चंदगड ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आलेल्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये  सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी पासुन अर्ज भरण्याच्या शनिवार दिंनाक १० तारखेपर्यंत उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसिदार शिवाजी शिंदे यांना चंदगड नगर पंचायत कृति समितीच्या वतीने देण्यात आले.

गेल्या चार महिन्यापासुन सुरु असलेल्या नगर पंचायतीचा लढा दिवसें-दिवस अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे मागच्या सर्व पक्षीय बैठकीत ठरवण्यात आले होते. त्यानुसार आज चंदगड नगर पंचायत कृती समितीच्या वतीने नुतन प्रशासकीय इमारती समोर साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती नगर पंचायत कृती समितीचे अध्यक्ष शिवानंद हुंबरवाडी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जि.प.सदस्य सचिन बल्लाळ, पं.स.सदस्य दयानंद काणेकर, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल दळवी, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष बाबुराव हळदणकर, माजी सरपंच अरुण पिळणकर, माजी जि.प.सदस्य राजेंद्र परिट,अल्लीसो मुल्ला, चंद्रकांत दाणी, उद्योजक सुनिल काणेकर, सुरेश सातवणेकर, सुधीर मोरे, मनोहर चंदगडकर, जगन्नाथ सातवणेकर, मारुती पाऊसकर, सत्तार शहा, महेश कासार, विरेंद्र कांबळे, दिलीप सबनीस, दिनेश शेलार, जाकीर नाईक, दिलावर सय्यद, अब्दुलरहेमान नेसरीकर आदींच्या सह्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या