भुदरगड सकल मराठा समाजाच्या वतीने तिरडी मोर्चा

सामना प्रतिनिधी । गारगोटी

भुदरगड तहसील कार्यालयासमोर गेले ४ दिवस सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज गुरूवारी अचानक सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. या तिरडी मोर्चा वेळी कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटीच्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या मोर्चाची सुरवात गारगोटीचे आराध्य दैवत जोतिबा मंदिर पासून सुरवात करण्यात आली.

सरकारच्या विरोधात घोषणा देत ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देऊन तिरडी मोर्चा तहसील कार्यालय समोर हुतात्मा चौकात आला. या ठिकाणी सरकारच्या तिरडीचे दहन करण्यात आले.

यावेळी भुदरगड तालुक्यातील युवती, युवकांची आणि महिलाची संख्या लक्षणीय होती. यावेळी सालपेवाडी ता.भुदरगड येथील कुमारी नीलम मुळीक या युवतीने भाषण केले. या मोर्चात प्रा. अर्जुन आबिटकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश शिंदे, शिवराज देसाई, प्रहार संघटनेचे मच्छिद्र मुगडे, संदीप देसाई, मराठा क्रांती संघटनेचे नंदकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शरद मोरे, प्रा. आनंद चव्हाण, माजी उपसरपंच अरुण शिदे, नितीन बोटे, अजित चौगले, ग्राम पंचायत सदस्य रणधीर शिंदे, संग्राम पोफळे यांच्यासह गारगोटी शहरातील नागरीक उपस्थित होते. यावेळी भुदरगड पोलिसांनी गारगोटी शहरात चागला बंदोबस्त ठेवला होता.

ठिय्या आंदोलनाला आमदार प्रकाश अबिटकर व गोकुळ संचालक, बिद्री संचालक धनाजीराव देसाई, जिल्हा परीषद सदस्या सौ. रेश्मा राहुल देसाई, ग्राम पंचायत सदस्या सौ. स्नेहल विजय कोटकर, सौ. मेघा सचिन देसाई, स्मिता अजित देसाई, कल्याणराव निकम, माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष बी. एस. देसाई, ग्रा. प. सदस्य जयवंत गोरे, भुदरगड तालुका ग्रंथालय संघटना यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला.