वल्दारिस कोठडीतील मृत्यू प्रकरण पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत

259

वडाळा पोलीस ठाण्याच्या कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आठ पोलिसांविरोधात कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने आज हायकोर्टात दिली.

मोबाईल चोरीच्या गुह्याखाली रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या अग्नेलो वल्दारिस याचा 18 एप्रिल 2014 साली कोठडीत मृत्यू झाला, मात्र आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळालगत आढळला असून अपघाती मृत्यूची पोलिसांनी नोंद केली. आपल्या मुलाला पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळेच त्याचा बळी गेला असा आरोप करत अग्नेलो याचे वडील लिओनार्द यांनी नुकसानभरपाई तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून हायकोर्टात याचिका दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या