महिला कर्मचार्‍यांनी मेकअप करून येऊ नये, सरकारी इस्पितळाचा फतवा

सामना ऑनलाईन । आगरा

उत्तर प्रदेशच्या आगरा जिल्ह्यातील एका सरकारी इस्पितळाने आपल्या कर्मचार्‍यांसाठी फतवा काढला आहे. महिला कर्मचार्‍यांनी मेक अप न करता कामाला यावे तसेच पुरुषांनी जीन्स आणि टीशर्ट परिधान करू नये असे म्हटले आहे.

आगराच्या फतेहबाद सामुहिक आरोग्य केंद्राने तशी सूचनाच कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. महिला कर्मचार्‍यानी मेक अप न करता कामाला हजर रहावे तसेच पाश्चिमात्य कपड्यांऐवजी साडी किंवा सलवार कमीज परिधान करावे. फक्त महिलाच नव्हे तर पुरुष कर्मचार्‍यांनाही प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. पुरुष कर्मचार्‍यांनीही जीन्स टीशर्ट न घालता त्यांनी फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट आणि काळे बूट घालणे अपेक्षित आहे. बुधवारी एका बैठकीत हा निर्णय घेतला असून प्रशासनाने तशीच सूचनाच जारी केली अहे.

आपली प्रतिक्रिया द्या