‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी, जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या 7000 मुलींची घेतली होती भेट

‘द केरला स्टोरी’ या सिनेमाक आसिफाची भूमिका साकारणाऱ्या सोनिया बालानी हिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. कोणी तिला बघून घेईनची धमकी देत आहे तर कोणी तिला जीवे मारण्याची धमकी देत आहे. सोनियाने सांगितले की, जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या 7000 मुलींची भेट घेतली होती. त्या सर्व मुली आता आश्रमात राहतात.

पश्चिन बंगालमध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती, त्याबाबत सोनियाला प्रश्न विचारला असता तिने सांगितले, हे चुकीचे आहे. या सिनेमावर बंदी लावायला नको हवी होती. याआधी अशाप्रकारे भूमिका करणाऱ्या कलाकारांना धमक्या मिळतात. सोनिया ही उत्तर प्रदेशातील आग्रा येथे राहते. ती झूलेलाल भवनात आपले वडिल रमेश बलानी आणि आपले कुटुंबियांसोबत प्रसारमाध्यमांशी बोलत होती. एका प्रश्नाचे उत्तर देताना सोनियाने सांगितले की, ती स्वत: जाऊन त्या पिडीत मुलींना भेटली आहे. त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी मी ऐकल्या आहेत. मुलींसोबत झालेले अत्याचार ऐकून वाईट वाटले होते. या मुलींची कथा सर्वांना सांगायची होती. यासाठी ‘द केरला स्टोरी’ मध्ये आसिफाची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आणि आसिफाची भूमिका पडद्यावर साकारली. सोनियाने पुढे सांगितले की, रिअल लाईफमध्ये आसिफाच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. सुरूवातीला निगेटिव्ह भूमिका साकारायची नाही असे ठरवले होते, पण आता तिला आव्हानात्मक भूमिका आवडू लागल्या आहेत.

‘द केरला स्टोरी’च्या सीक्वेलबाबत विचारण्यात आले असता, सोनियाने सांगितले की, तिला याबाबत काही माहित नाही. या सिनेमाबाबत सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. सोनियाने सांगितले की, आता प्रेक्षक स्टारकास्टला नाही तर सिनेमाचा विषय आणि कन्टेण्ट पाहायला जातात. हेच कारण आहे की, ‘द केरला स्टोरी’ सिनेमा प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मुस्लिम तरुणींना हा सिनेमा आवडला आहे. अनेक तरुणींना संपर्क करुन तिचे कौतुक केले आहे. सोनियाने बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कुटुंबियांनादेखील आवाहन केले आहे की, तो मुलांचे रूममेट्स आणि क्लासमेट्स यांची पूर्ण माहिती घ्यावी. कोणाच्या प्रलोभनांना बळी पडू नये. पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे.

सोनिया बालानी सिनेमांमध्ये काम करण्यापूर्वी टेलिव्हिजनमध्ये काम केले आहे. ती ‘डिटेक्टिव दीदी’, ‘तू मेरा हिरो’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ सारख्या शोमध्ये दिसली आहे. आता तो ‘द केरल स्टोरी’मुळे चर्चेत आहे.