कृषीविद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर कोरोनाचा शिक्का; प्रमाणपत्र परत घेऊन नवीन देणार

518
dadaji-bhuse

राज्यातील काही कृषी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेकर ‘प्रमोटेड कोविड-19’ असा शिक्का मारण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल कृषीमंत्री दादा भुसे यांनी चोकशीचे आदेश दिले आहेत. कृषीचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्राकर कोरोनाचा कोणताही शिक्का नसेल. दिलेली प्रमाणपत्र परत घेऊन नवीन देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अकोला कृषी विद्याापीठा अंतर्गत अमराकती कृषी विद्यालयामधील 247 विद्यार्थ्यांना ‘कोविड-19’ असा उल्लेख असलेल्या गुणपत्रिका देण्यात आल्या. या प्रकारानंतर विद्यार्थी आणि पालकवर्गातून तीक्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यासंदर्भात कृषीमंत्री भुसे यांनी असा शिक्का मारण्याचे कोणतेही आदेश शासनाने दिलेले नाहीत. ‘कोविड-19’ असा उल्लेख असणारी प्रमाणपत्र परत घेऊन नवीन देण्यात येतील, असे आश्वासन विद्यार्थी व पालकांना दिले आहे.

संबंधितांची चौकशी करून कारवाई करा

महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना क सर्व कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंना कृषीमंत्र्यांनी यासंदर्भात पत्र पाठविले आहे. राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेकर ‘कोविड-19’ चा उल्लेख करण्याचे आदेश देणाऱयांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या