पंतप्रधानांनी सांगूनही मंत्री राजीनामा देताहेत, नक्कीच काही तरी गडबड आहे!

sanjay-raut-press

विरोधी पक्ष सातत्याने कृषीविषयक विधेयकांना विरोध करत असतानाच केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील काही घटक पक्षही या विधेयकाला विरोध करीत आहेत. एनडीएतील शिरोमणी अकाली दलानेही कृषिविषयक विधेयकांचा निषेध करीत अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करूनही मंत्री राजीनामा देत आहेत. याचाच अर्थ काहीतरी गडबड नक्कीच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी दिली.

कृषिविधेयकावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, कृषिविषयक विधेयकांवरून पंजाबमधील शेतकऱयांमध्ये नाराजी आहे. पंजाबमधील शेतकरी संतप्त आहेत, याचाच अर्थ संपूर्ण देशातील शेतकऱयांमध्ये संताप आहे. महाराष्ट्र पंजाबसोबत आहे. पंजाबनंतर आता हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही शेतकऱ्यांची निदर्शने सुरू होतील. आम्ही खोटं बोलत होतो. शिरोमणी अकाली दल खोटं बोलत असेल तर मग हरिश्चंद्र कोण आहे, असा सवाल राऊत यांनी केला.

कृषीविषयक विधेयकांवरून आता सर्वांशी चर्चा केली जातेय. हे विधेयक निवड समितीकडे पाठवाय हवे. या मुद्दय़ावर आम्ही शरद पवारांशी चर्चा करू. कॉंग्रेस आणि सर्कजण एकत्रितपणे निर्णय घेऊ, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

एनडीए अस्तित्कातच नाही असं वाटतंय

आम्ही एनडीएला सोडलं नाही. तर खोट्या राजकारणामुळे आम्हाला भाग पाडले गेले. आम्ही दोन्ही सर्कात जुने सहकारी होतो. बाकीचे पाहुणे आहेत़ शेतकऱयांच्या मुद्दय़ावर सर्वांना सोबत घेतले पाहिजे. आता एनडीए अस्तित्त्कातच नाही, असं वाटतंय. आजही आम्ही आणि अकाली दल सोबत आहोत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर ताशेरे ओढले.

आपली प्रतिक्रिया द्या