चिंदर येथे आज ‘कृषी मेळावा’

सामना ऑनलाईन । मालवण

मालवण पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त चिंदर गावठणवाडी प्राथमिक शाळा नं. १ येथे शनिवार १ जुलै रोजी सकाळी १० वाजता तालुकास्तरीय कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सभापती मनीषा वराडकर असणार असून उदघाटन वित्त व बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कृषी मेळाव्याला तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य तसेच चिंदर सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समिती उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले आहे.