ऑडिओ ब्रीजद्वारे कृषी सहायकांशी संवाद साधणार, कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांची माहिती

सामना ऑनवाईन । मुंबई

शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी सहायकासाठी ग्रामपंचायत अथवा तलाठी कार्यालयामध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी जेणेकरून शेतकऱ्यांना सहज संपर्क साधणे शक्य होईल. त्याचबरोबर कृषी सहायकांशी संवाद साधण्यासाठी ऑडिओ ब्रिज यंत्रणा राबविण्याचे निर्देश कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी दिले.  बोंडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाची आढावा बैठक घेतली.या बैठकीला विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील क्षेत्रीयस्तरावरील कृषी विभागाची रिक्त पदे तातडीने भरावीत जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ पोहोचेल. राज्यभर असलेले कृषिमित्र यांच्या कडून अधिक प्रभावी कामगिरीसाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आराखडा, मोबाईल ॲप तयार करण्याचे निर्देश कृषिमंत्री यांनी दिले. राज्याचे नवनियुक्त कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी

आपली प्रतिक्रिया द्या