कंडोम नसल्याने गुप्तांगाला ‘सुपर ग्लू’ फासणाऱ्या तरुणाचा मृत्यू

25 वर्षांच्या एका तरुणाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला आहे. या तरुणाने कंडोम नसल्याने गुप्तांगाला ‘सुपर ग्लू’ फासला होता आणि यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. सलमान मिर्झा असं या तरुणाचं नाव आहे. तो त्याच्या प्रेयसीसोबत 22 जून रोजी गुजरातमधील अहमदाबादेतल्या एका हॉटेलमध्ये गेला होता. दोघे रंगात आल्यानंतर सलमानच्या लक्षात आलं की तो कंडोम विसरला आहे. यामुळे सलमानने त्याच्या गुप्तांगाचे तोंड ‘सुपर ग्लू’ ने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर तो बेशुद्धावस्थेत हॉटेलच्या खोलीत सापडला होता. त्याचा मित्र फिरोज शेख याने सलमानला रुग्णालयात दाखल केलं होतं.

सलमान याला सोला येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याची प्रकृती खालावत गेल्याने त्याचा मृत्यू झाला. पोस्ट मॉर्टेममध्ये त्याच्या मृत्यूचे कारण हे त्याने कंडोमऐवजी केलेला भयंकर प्रकार असल्याचं उघडकीस आलं आहे. सलमान हा त्याच्या घरातला एकमेव कमावणारा व्यक्ती होता. सलमानच्या मित्रांनी सांगितलंय की तो आणि त्याची प्रेयसी व्यसनी होते. हे दोघेजण व्हाईटनर आणि सुपर ग्लू हुंगून नशा मिळवायचे. 22 जून रोजी या दोघांनी बेफाम नशा केली होती. यानंतर सलमानने हुंगण्यासाठी आणलेला सुपर ग्लू गुप्तांगावर फासला होता. याचा सलमानच्या शरिरावर विपरीत परिणाम झाला आणि सलमान जागीच कोसळला होता.

आपली प्रतिक्रिया द्या