नगर-बीड महामार्गावर भीषण अपघात, वऱ्हाडाची ट्रॅव्हल्स पलटली

नगर-बीड महामार्गावर कडा येथील कर्डिले वस्ती जवळ सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वऱ्हाडाची ट्रॅव्हल्स पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात वीस जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथून जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथे लग्नासाठी वऱ्हाडी बावधन ट्रॅव्हल्स (MHO5 Dk 6125) मधून आले होते. सोमवारी लग्नाचा कार्यक्रम उरकुन परत कल्याणकडे जाताना रात्री आठ वाजता ट्रॅव्हल्स रस्त्यावर पलटी झाली. अपघातात बसमधील 20 जण जखमी झाले.

जखमींना सरपंच तात्या ढोबळे आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात नेले आहेत. सर्व जखमींवर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. जखमीमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे.

जखमींची नावे

विंघ्नेस श्रावण बनसोडे, महेर श्रवण बनसोडे, श्रवण बनसोडे, कवू भगवान कांबळे, चंची श्रावण बनसोडे, शशिकांत जाधव, विलास डाडर,राजाबाई डाडर, सुनील पवार, सुनीता जाधव, अजय जाधव, धोंडबाई जाधव, बाळू कसबे विराज जाधव, पवन जाधव, कालिंद जाधव, अनिकेत जाधव, कनिराम राठोड (चालक), सुनील पवार.

आपली प्रतिक्रिया द्या