लॉकडाऊनमध्ये सुरू होतं बिग बझार, महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई

नगर शहरात बिग बझार हे शोरूम सर्रासपणे उघडे असल्याची माहिती महानगर पालिकेला कळाली. तेव्हा पालिकेच्या दक्षता पथकाने धाड घालून दंडात्मक कारवाई केली आहे.

शासनाच्या नियमानुसार जे काही लॉकडाऊन चे नियम लावून दिलेले आहे त्याचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश देण्यात आले होते. नगर शहरातील मनमाड महामार्ग असलेले बिग बझार हे शनिवार, रविवार दोन दिवस सुरू होते. आज रविवार असल्यामुळे बिग बजारमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. महानगरपालिकेच्या दक्षता पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा अनेक ग्राहक बिग बझारमधून खरेदी करत होते. तेव्हा महानगरपालिके बिग बझारवर 25 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तर पाईपलाईन रोड या ठिकाणी अमोल स्टोअर सुरु होते. या दुकान मालकावरही दंडात्मक कारवाई करण्यात आले असून नियमांचे पालन करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या