नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

नोकरीच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांना फसविणाऱ्या तोतया पोलिसाला कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस दलात नोकरीला लावून देतो असे सांगून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी मार्केट यार्ड जवळून ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर सुखदेव वाणी (वय – 32, रा. चिचोंडी खुर्द, पारेगाव रोड, ता.ये वला जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या आयटीआय कॉलेज जवळ, बुरुडगावरोड, नगर येथे राहतो.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर मोरे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ज्ञानेश्वर मोरे, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने केली आहे