नगर जिल्ह्याचे टेन्शन वाढले, 3 दिवसात तब्बल 78 रुग्ण आढळले

540

नगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असून गेल्या 3 दिवसात तब्बल 78 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांचे टेन्शन वाढले आहे. शुक्रवारी सकाळी 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सायंकाळी आणखी 28 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये नगर शहरातील 24, कर्जत तालुक्यातील 2, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 105 इतकी झाली आहे.

नगर शहरात सिद्धार्थ नगर भागात 6, वाघगल्ली नालेगाव भागात 4, तोफखाना भागात 12 आणि सिव्हिल हडको भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय शिर्डी येथे एक आणि कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

3 दिवसात 78 रुग्ण
जिल्ह्यात 24 जुन रोजी 24 रुग्णांचा, तर 25 जुन रोजी 21 रुग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 2 दिवसात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 45 ने वाढली होती. आता यात शुक्रवारी आढळलेल्या 33 रूग्णांची भर पडल्याने 3 दिवसात 78 रुग्ण वाढले आहेत.

265 जण कोरोनामुक्त
दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यातील 5 कोरोनाग्रस्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 265 इतकी झाली आहे. तर सध्या ॲक्टिव रुग्णसंख्या 105 इतकी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या