महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण, गुन्हा दाखल

12


सामना ऑनलाईन । नगर

नगर महापालिकेच्या कचरा गाडीवर कार्यरत असलेल्या एका सफाई कर्मचाऱ्याला केडगाव परिसरात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जालिंदर बोरगे असे मारहाण झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव असून कचरा उचलण्याच्या वादातून गुरुवारी सकाळी ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी जालिंदर बोरगे या कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून मिलिंद कुलकर्णी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या