नगर – बॉम्ब निकामी करताना स्फोट, एकाचा मृत्यू

1246
k-k-range-ahmednagar

नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे बॉम्ब निकामी करत असताना बॉम्बचा स्फोट होऊन यात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना अकरा वाजता के.के. रेंज हद्धीत माळरानावर घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना केले आहे.

खारेकर्जुने येथील परिसरात के.के. रेंज आहे. येथे दारूगोळ्याचे प्रशिक्षण चालते. यामध्ये बॉम्बगोळयाचा सराव केला जातो. हे निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्त केली आहे. मात्र खारेकर्जुने येथील ग्रामस्थ या ठेकेदारांनाची नजर चुकवून लष्करी हद्दीमध्ये शिरून हे बॉम्ब गोळा करतात. असाच प्रकार आज घडला. निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी येथील काही जण गेले होते. त्यांना जिवंत बॉम्ब सापडला. तो निकामी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र जागीच त्याचा स्फोट होऊन भिवा सहादू गायकवाड यांचा मृत्यू झाला.

बॉम्बमधील साहित्याची किंमत जास्त असल्यामुळे जीवाची पर्वा न करता आसपासचे लोक बॉम्ब चोरीचा प्रयत्न करतात. आतापर्यंत बरेचजण अशा घटनेत मरण पावलेले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या