संगमनेरजवळ ट्रक-कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी

लग्नसोहळ्यावरून परतणाऱ्या मित्रांच्या कारला संगमनेरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आंबी खालसाफाटा येथे हा अपघात झाला.

आनंद सुनील भटवेरा (वय – 22) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून संकेत अशओक कडस्कर (वय 21) आणि योगेश भाऊसाहेब खर्डे (वय – 22) हे दोघे जखमी झाले आहेत. तिघेही कोल्हार येथील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही कोल्हापूर येथे एका लग्नसोहळ्यासाठी गेले होते. लग्न आटोपून पुणे-संगमनेर मार्गे घरी परतत असताना आंबी खालसाफाटा येथे मागून आलेल्या भरधवान वेगातील ट्रकने कारला उडवले. यात कार चालवणारा आनंद जागीच ठार झाला, तर संकेत आणि योगेश जखमी झाले. त्यांच्यावर संगमनेर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

अन् अपघातातून बचावला

कोल्हापूर येथील विवाह सोहळ्यासाठी चौघे मित्र गेले होते. लग्नसोहळ्यावरून येत असताना एक मित्र पुण्यात काही कामानिमित्त उतरला आणि एसटीने कोल्हारला पोहोचतो असे मित्रांना सांगितले. मात्र पुढे जाऊ कारचा अपघात झाला आणि सदर तरुण अपघातातून बचावला.