नगरमध्ये कांदा शेतकरी हवालदील, अवकाळी पावसामुळे हाताश आलेला घास पाण्यात

402

अवकाळी पावसाचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेतामध्ये कांदा हा वाया जाऊ लागल्यामुळे अखेरीस शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊन कांदा काढणीला सुरुवात केलेली आहे शेतातला कांदा सडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेला घास गेल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झाले आहेत

नगर तालुक्यातील जेऊर येथील शेतकऱ्यांची सध्या कांदा काढण्याची लगबग सुरू झाली आहे. नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता कांदा मोठ्या प्रमाणात लावल्यामुळे यांचा त्याला चांगला भाव मिळतो. आपल्याला चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला होती. मात्र तसे न झाल्यामुळे आता ऐन वेळेला पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग आता संकटात सापडले आहेत. त्यामुळे आता शेतामधला कांदा सडून गेलेला आहे. शेतकरी वर्गाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.-

  • शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा सरकारच्या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. कांदा लागवड झालेल्या शेतकऱ्यांची तोंडाला मास्क बांधून कांदा काढण्याचे काम करत आहे
आपली प्रतिक्रिया द्या