पती-पत्नीचे भांडण… सासरे- मेहुण्यांची जावयास मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

अहमदपूरशहरातील अंबाजोगाई रोडवरील लक्ष्मीनारायण मंदीरा जवळ शेतीचे अवजारे तयार करणाऱ्या एका व्यापाऱ्याचे आणि त्याच्या पत्नीचे भांडण झाले. पत्नीने भांडण झाल्याचे माहेरी कळविले असता सासरे, मेहुणे, यांच्यासह आठ जणांनी त्या व्यापाऱ्यास मारहाण केली. याप्रकरणी अहमदपूर पोलीसात सदरील आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे

याविषयी सविस्तर माहीती अशी की, शिवाजी बाबुराव सरवदे (वय 40) यांनी अहमदपूर पोलीसात तक्रार दाखल केली. ”15 मे रोजी मी नेहमी प्रमाणे माझ्या दुकानात असताना दुपारी 11 च्या सुमारास माझे माझ्या पत्नीसोबत भांडण झाले. तिने तिच्या माहेरी सोनवती येथे माझ्या सासु सासऱ्यास त्याबाबत सांगितले. त्यानंतर दुपारी माझे सासरे वामन शिवराम गवळी , मेहुणा विजय वामन गवळी, बालाजी वामन गवळी, पत्नीचा मामा तानाजी घोडके , तानाजी बनसोडे , संतोष गडदे , साधु शिवराम गवळी , अशोक शिवराम गवळी यांनी माझ्या वर्क शॉप मध्ये मला लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यांनी माझ्या मुलाला देखील धक्काबुक्की करून मला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझ्या घरातील पैसे व सोने पत्नीने त्यांच्या जवळ काढून दिले. असे सरवदे यांनी पोलिसांना सांगितले. यावरून अहमदपूर पोलिसांनी सदर आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात केला आहे.