अहमदपूरमध्ये सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

1040

फुलेवाडी रोड वैजापूर तालुका येथील एक महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलीसोबत अहमदपूर येथे आली होती. त्यावेळी शेनकुड गावातील 22 वर्षीय तरुणाने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याविषयी पीडित मुलीच्या आईने अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, सचिन संजय गिरी (22) याने दि.13 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजल्याच्या सुमारास फिर्यादीच्या मुलीला कुरकुरे, चिप्स, चॉकलेट देऊन मोबाईल वर गेम खेळू असे म्हणून घरात नेले त्यानंतर त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी सचिन विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन.व्ही.जाधव हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या