लांब पल्ल्याच्या प्रवासात आता पाण्याचे नो टेन्शन, टॉयलेटमधील पाणी संपण्याआधीच ‘एआय’ अ‍ॅलर्ट देणार

तुम्ही लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेने प्रवास केला असेल, तर तुम्हाला शौचालयात पाणी नसल्याची समस्या कधी जाणवली असेल. ट्रेनमध्ये पाणीच येत नसेल तर आपण शौचालयाचा वापर करू शकत नाही. हात-पाय-तोंड धुऊ शकत नाही. पुढचे वॉटर फिलिंग स्टेशन कधी येईल, कधी पाणी भरलं जाईल, अशा विवंचनेत प्रवासी असतात. या समस्येवर आता रेल्वेच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटने उपाय शोधला आहे. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमध्ये हा प्रयोग केला आहे. रेल्वेच्या रॅकच्या एसी कोचमध्ये, पाण्याची साठवण टाकी स्लंगखाली किंवा कोचच्या खाली असलेल्या चाकाजवळ असते. त्यात भरलेले पाणी मोटारीने शौचालयात पाठवले जाते. आता अंडर स्लंग वॉटर टँकमध्ये अशी उपकरणे बसवण्यात आली आहेत. ज्यामुळे कोणत्या टाकीत किती पाणी शिल्लक आहे हे कळण्यास मदत होईल. पाण्याची पातळी 30 टक्क्यांपेक्षा कमी होताच गुवाहाटीमधील कॅरेज पंट्रोलवर ताबडतोब अलर्ट पोहोचेल.

ब्रह्मपुत्रा मेलपासून सुरुवात

ईशान्य पूर्व रेल्वेने आसाममधील कामाख्याहून दिल्लीला येणाऱ्या ब्रह्मपुत्रा मेलपासून हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. वास्तविकता या ट्रेनला पाच रॅक आहेत. परंतु एका रॅकमध्ये अत्याधुनिक जल पातळी निरीक्षण यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही रेक 16 ऑगस्टला कामाख्याहून दिल्लीला रवाना झाली. ब्रह्मपुत्रा मेलमध्ये पाणी संपल्याच्या खूप तक्रारी रेल्वेला मिळाल्या होत्या.