शिवसेना आमदार शंभूराजे देसाईंच्या माध्यमातून १२,८०४ पुरग्रस्तांना मदतीचे वाटप

420

गेले सात ते आठ दिवसापुर्वी पाटण विधानसभा मतदारसंघात सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे व कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीकाठी महापुराची परिस्थिती निर्माण झाली. ७६ डोंगंरी गावांमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना तसेच संपर्कहीन असलेल्या गांवामधील अनेक कुटुंबांना बाहेरच्या विविध सेवाभावी संस्था, आमदार शंभूराजे देसाई व शिवसेना पक्षाच्यावतीने पाटण मतदारसंघातील सुमारे ३५३८ बाधित कुटुंबापर्यंत पोहचवून या कुटुंबातील १२,८०४ बाधित व्यक्तीपर्यंत ही मदत तातडीने पोहचविण्याचे काम आमदार शंभूराजे देसाईंच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील अनेक गांवामध्ये मोठया प्रमाणात नुकसान झाले. कोयना धरणातून एकूण १८ फुटाने धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे कोयना नदीपात्रात मोठया प्रमाणात पाणी येवून ते नदीकाठच्या गावांत घुसल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसुन नदीकाठच्या गावातील अनेक कुटुंबाचे नुकसान झाले आहे. वांग मराठवाडी, मोरणा गुरेघर ही धरणे ओंसडून वहात असल्यामुळे अनेक गांवे संपर्कहीन झाली होती.पाटण विधानसभा मतदारसंघात सुमारे ११६७ कुटुंबांचे  या अतिवृष्टी व महापुरामुळे घरांचे अशंत: तसेच पुर्णत: नुकसान झाले असून या नुकसानग्रस्तांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तालुका प्रशासनातील महसूल तसेच ग्रामविकास विभागाकडून गेली चार दिवस सुरु असून अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाना हातभार लावण्याकरीता तसेच त्यांचा संसार सावरण्याकरीता आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहेत.

शिवसेनेच्या वतीने मोठया संख्येने मदत आली ती सर्व मदत एकत्रित करुन बाधित कुटुंबापर्यंत पोहचविण्याचे काम तातडीने केले आहे. अतिवृष्टीबाधित व पुरग्रस्तांना मदत म्हणून १२,८०४ बाधित व्यक्तीपर्यंत आम्ही 10751 नग ब्लॅंकेट,२५७७६ पाण्याच्या बाटल्या, 4800 किलो तांदुळ, 120 किलो गहू, 1100 किलो कडधान्य, 84 किलो खाद्य तेल, 20 किलो चटणी, 25 किलो मीठ,90 बॅाक्स बिस्कीट, महिलांकरीता 2400 नग साड्या, मुलींना 300 नग कपडे, लहान मोठया मुलाकरीता 1030 नग टी शर्ट, मुलींचे गाऊन्स 1000 नग  तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या 177 किट, दैनंदिन वापरातील वस्तु 525 किट, फरसाण चिवडा 25 किलो असे साहित्यांचे वाटप केले आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघातील बाधित पुरग्रस्त व अतिवृष्टीबाधितांना सर्वांनी लावलेला हातभार पाटण मतदारसंघातील जनता कधीही न विसरणारी असून अतिवृष्टी व पुरामुळे काही काळ पाटण मतदारसंघात हाहाकार माजला होता त्यातून सावरण्याकरीता सर्वांनी चांगल्या रितीने हातभार लावला तसेच आपदग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला त्या सर्वांचे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शंभूराजेंंनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत.  यापुढेही अतिवृष्टीबाधित व पुरग्रस्तांना अधिकची मदत मिळविणेचा माझा प्रयत्न सुरु असून ती मदत देखील अतिवृष्टीबाधित व पुरग्रस्तांपर्यंत पोहचविण्याकरीता कटीबध्द असल्याचेही देसाईं यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या