पूरग्रस्तांना मदतीचे वाटप सुरु

रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदतकार्य सुरु झाले असून बुधवारी खेड आणि चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्तांना पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते सुकवली ग्रामपंचायत येथे 14 ग्रामस्थांना पूरग्रस्त मदती अंतर्गत पाच हजाराचे धनादेश तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. भोस्ते गाव येथील वीराची वाडी येथील १९ पुरग्रस्तांना शासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार शासकीय मदतीचे चेक व रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू तसेच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी सूनिल चव्हाण,  योगेश कदम, प्रांत सोनावणे, तहसिलदार जाधव, तालुकाप्रमुख राजा बेलोसे उपस्थित होते. खेड खोपी फाटा वेरळ गाव येथील १६ पुरग्रस्तांना शासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार शासकीय मदतीचा धनादेश व रत्नागिरी जिल्हा वायकर यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू तसेच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी सूनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम,  योगेश कदम, प्रांत सोनावणे, तहसिलदार जाधव, तालुकाप्रमुख राजा बेलोसे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या