ऐलमा, पैलमा गणेश देवा.

 

नमिता वारणकर

बालपणीच्या आठवणी जागवणारा भोंडलाऐलमा, पैलमाएक लिंबू झेलू बाई दोन लिंबूअक्कण माती, चिक्कण माती अशी गमतीशीर गाणी म्हटली जातात. पाटावर समृद्धीचं प्रतीक असणाऱया हत्तीच्या चित्राभोवती रांगोळी, फुलांची आरास केली जाते. त्याभोवती फेर धरून हा खेळ खेळला जातोयानिमित्त होणारी खिरापत ओळखण्याची मजा काय वर्णावीकाळानुरूप मनोरंजनाची साधनं बदलली तरी लहानपणी पारंपरिकता म्हणून खेळल्या गेलेल्या भोंडल्याच्या आठवणी मात्र काही अभिनेत्रींच्या मनात आजही ताज्या आहेत.

keasrkar

ईशा केसकर…..दहा वर्षांची होईपर्यंत मी भोंडला खेळायचे.   पाळणाघरातील  भिडेकाकूंकडे आम्ही भोंडला करायचो. तो मला परंपरेऐवजी माझी आठवण म्हणून लक्षात आहे.

आम्ही खूप उचापती करायचो. खिरापत आधीच खायचो. सुरळीच्या वडय़ा किंवा नारळाची बर्फी अशी माझ्या आईच्या हातची फेव्हरेट खिरापत होती. मला दोन्हीही पदार्थ खूप आवडायचे. संध्याकाळी सगळ्या जणी छान नटून एकत्र यायच्या. केसात गजरे माळायच्या. छोटय़ा मुली परकर-पोलकं, चंद्रकोर लावून सजायच्या. इकडे तिकडे पळायच्या. ऐलमा-पैलमा, झिप्र्या कुत्र्याला सोडा गं बाई…अशी गाणी आजही मला आठवतात. तुम्ही कितीही मॉडर्न व्हा किंवा काहीही व्हा, पण काही असे सण आहेत जे इतरांना काहीच त्रास देत नाहीच. असे सण साजरे व्हायला हवेत.

डिस्को आणि पबचं फुकट व्हर्जन म्हणजे दांडिया आहे, हे लोकांच्या लक्षात यायला हवं. गणपती, नवरात्र सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. त्याची पारंपरिकता टिकवून ठेवावी.  उत्सव इतरांना त्रासदायक ठरू नयेत, त्यातही शिस्त पाळली गेली पाहिजे.

suruchi

सुरुची अडारकर….लहानपणी खूप मजा यायची भोंडला खेळताना. यामधली खिरापत ओळखणे ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट. छान नटून थटून जायचं. पाटावर हत्ती काढलेला असायचा. त्यातली मजेशीर आणि गमतीशीर गाणी. खूप धमाल करायचो. इमारतीतील लहान लहान मुली  एकत्र येऊन भोंडला खेळायच्या. खिरापत ओळखली की, खाऊ खायला मिळायचा. सगळ्यांमध्ये आपण अचूक खिरापत ओळखलीय याचा वेगळा आनंद असायचा. भोंडल्याशी माझ्या लहानपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत.

भोंडला ही आपली पारंपरिक प्रथा आहे. त्यामुळे आजच्या लहान मुलींना ती कळावी. प्रत्येक मुलीने त्याचा आस्वाद घ्यायला हवा. आधीच्या काळात लहान मुली, स्त्रियांसाठी विरंगुळा हाच होता. इंटरेनटच्या काळात या गोष्टी हरवत चालल्या आहेत. दांडिया कमर्शियल झाल्यामुळे हल्ली लोकांना दांडियाला जाण्याची जास्त क्रेझ आहे. भोंडल्यांचा आनंद आजी, आई, लहान मुलीं सगळेच आनंद घेतात. यातली गंमत जोपासली गेली पाहिजे.

akshara

अक्षया देवधर…भोंडला मला खूप आवडतो. लहानपणी खेळायचे, त्यावेळी आम्ही एका चाळीवजा सोसोयटीत राहायचो. सगळे शेजारी एकत्र कुटुंबाप्रमाणे राहायचे. तिथे आमच्या सोसायटीचा एकत्र भोंडला व्हायचा. या भोंडल्यात मी कायम सहभागी व्हायचे. लहानपणी खूपच मजा यायची, कारण काहीही ना काही प्रोत्साहन देणारी गोष्ट या खेळात असायची. भोंडल्याची गाणीही खूप आनंद देणारी आहेत. खिरापत ओळखायच्या वेळी आधीच आम्ही लोकांच्या घरातील पदार्थांचे वास घेऊन खिरापत ओळखायचा प्रयत्न करायचो. गच्चीवर भोंडला व्हायचा. मी पहिल्या मजल्यावर राहायचे. पहिल्या मजल्यावरून शेवटच्या मजल्यावर जाईपर्यंत मला कुणाच्या घरात काय केलंय हे आधीच कळायचं.

आज भोंडला मागे पडलाय, असं मला वाटतंय. जितक्या आकर्षक पद्धतीने दांडिया खेळला जातो. तितका भोंडला खेळला गेल्याचं हल्ली ऐकायला मिळत नाही. यानिमित्ताने पूर्वीच्या स्त्रीया एकत्र यायच्या. सगळे जण एकत्र आल्या तर परंपरा, खेळ जोपासल्या जातील.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या