खासदार औवेसी यांनी नागरिकता संशोधन विधेयकाची प्रत फाडली

1202

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी लोकसभेत नागरिकता संशोधन विधेयक मांडले. गोंधळातच हे विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. या विधेयकाचा एमआयएम खासदार असदुद्दीन औवेसी यांनी विरोध केला. या विधेयकावर आपले मत मांडल्यावर त्यांनी विधेयकाची प्रतच फाडली.

सरकार चीनबाबत काहीच बोलत नाही. त्याबाबत कोणतीच भूमिका घेतली जात नाही. नागरिकता संशोधन विधेयक हिटलरच्या नियमांपेक्षाही घातक आहे. देशात पुन्हा विभागणी करण्यात येत आहे. या विधेयकामुळे देशाला धोका असल्याचे औवेसी म्हणाले. आपले मत मांडल्यानंतर त्यांनी विधेयकाची प्रतच फाडली.

याआधी विधेयक मांडल्यावर यावर मतदान घेण्याची मागणी विरोधकांनी केली. मतदानात विधेयक सादर करण्याच्या बाजूने 293 तर विरोधात 82 मते होती. या विधेयकावरील चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या