100 कोटी हिंदूंवर 15 कोटी मुस्लिम भारी; एमआयएमची खुलेआम धमकी

1316

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुसलमीन अर्थात ‘एमआयएम’ने हिंदूंविरुद्ध पुन्हा गरळ ओकली आहे. 100 कोटींवर (हिंदू) आम्ही 15 कोटी (मुसलमान) भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिले जात नसेल तर मिळवावे लागेल, अशी धमकी ‘एमआयएम’चा माजी आमदार वारिस पठाणने दिली आहे. पठाणच्या या बेताल वक्तव्यानंतर राजकीय घमासान सुरू झाले आहे. पठाण यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.

वारिस पठाण हा मुंबईतील भायखळा मतदारसंघाचा माजी आमदार आहे. कर्नाटकात गुलबर्गा येथे सभेत बोलताना पठाणचा तोल गेला आणि तो बरळला. ‘सीएए’, ‘एनआरसी’विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देऊन वारिस पठाण म्हणाला, ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’ हे आम्ही शिकलो आहोत, पण त्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. स्वातंत्र्य दिले जात नसेल तर जबरदस्तीने मिळवावे लागेल. महिलांना पुढे करतो असे आम्हाला म्हणतात. पण आता केवळ महिला बाहेर पडल्या तर तुम्हाला घाम फुटला, मात्र आम्ही (मुस्लिम) सगळे बाहेर पडलो तर तुमचे काय होईल! आम्ही (मुस्लिम) 15 कोटी आहोत. पण 100 कोटींवर (हिंदू) भारी आहोत असे चिथावणीखोर वक्तव्य पठाणने केले.

कारवाईची मागणी

वारिस पठाणच्या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य पठाण याने केले असून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी मौलवींनीही केली आहे.

ओवेसींच्या सभेत पाकिस्तान झिंदाबाद

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगळुरू येथील सीएए विरोधी सभेत एका तरूणीने अचानक मंचावर येऊन पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने गोंधळ उडाला. ओवेसी यांनी तत्काळ या घटनेचा निषेध केला. पोलिसांनी त्या तरुणीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ओवेसी यांनी या घोषणेची निंदा केली आहे.

बेवकूफ, जाहील

‘‘बेवकूफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस? एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल तर तुम्ही 15 करोडच राहाल’’ असा हल्लाबोल गीतकार जावेद अख्तर यांनी वारिस पठाण याच्यावर केला आहे. ते कोल्हापुरात जागर सभेत बोलत होते. पाकिस्तान तयार होऊन जीना यांची इच्छा पूर्ण झाली, पण जीना यांची विचारसरणी आजही देशात आहे, अशी टीका जावेद यांनी वारिस पठाण याच्यावर केली असून 15 कोटींचा ठेका तुला कुणी दिला, असा सवालही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या