वैमानिकाला कोरोनाचा संसर्ग; एअर इंडियाने दिल्ली-मॉस्को विमान बोलावलं परत

725

शनिवारी सकाळी दिल्लीहून रशियासाठी निघालेले विमान एअर इंडीयाने परत बोलावले आहे. ‘नवभारतने’ दिलेल्या वृत्तानुसार, या विमानातील वैमानिकाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने या विमानाचा प्रवास मधेच रद्द करून हे विमान परत दिल्लीत बोलावण्यात आलं आहे.

दिल्लीहून रशियासाठी निघालेले हे विमान उझबेकिस्तान येथे पोहोचले होते. विमान उड्डाण करण्यापूर्वी विमानातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करावी लागते. हे विमान उड्डाण करण्याआधी या वैमानिकाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र कर्मचाऱ्यांने चुकून त्यांची चाचणी निगेटिव्ह आपल्याच सांगत त्यांना उड्डाण करण्याची परवानगी दिली. मात्र ही चूल लक्षात आल्यानंतर या विमानाला परत बोलावण्यात आलं. वंदे भारत मिशन अंतर्गत मॉस्कोमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना आणण्यासाठी हे विमान पाठवण्यात आलं होत. यामुळे या विमानात वैमानिक आणि केबिन क्रूच होते. त्याव्यतिरिक्त विमानात कोणीही नव्हतं.

मिळालेल्या माहितीनुसार, विमान 12.30 पुन्हा दिल्ली येथे पोहोचले आहे. केबिन क्रूला सध्या क्वारंटाईन करण्यात आलं आहे. विमानालाही सॅनीटायझर केलं जाणार आहे. तसेच या जागी दुसरे विमान मॉस्कोला पाठविले जाणार आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी प्रवाशांविना या विमानाने रशियासाठी दिल्लीहून उड्डाण केले. विमानाला उड्डाण करून दोन तास झाले होते. जेव्हा वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले तेव्हा अहवालाच्या निकालाची तपासणी केली जात होती. पण हे प्रकरण लपवण्याऐवजी एअर इंडियाने थेट वैमानिकाशी संपर्क साधला आणि परत येण्यास सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या