Video -दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला बुधवारी रात्री भीषण आग लागली. सुदैवाने आग लागली त्यावेळी विमानात एकही प्रवासी नव्हता. विमानाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक आग लागल्याने कर्मचाऱ्याची तारांबळ उडाली.

एअर इंडियाचे B777-200 LR हे विमान दिल्लीहून अमेरिकेतील सॅन फ्रांसिस्को येथे जाणार होते. त्याअगोदर विमानाची दुरूस्ती सुरू असताना विमानाच्या मागील बाजूस अचानक आग लागली. यावेळी विमानतळावरील अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन काही वेळातच आग विझवली.