
नागरि विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 6 डिसेंबर 2022 च्या पॅरिस-दिल्ली विमानात (AI-142) नियम न पाळणाऱ्या दोन प्रवाशांची वेळेवर माहिती न दिल्याबद्दल एअर इंडियावर 10 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
एका मद्यधुंद प्रवाशाला लॅव्हेटरीमध्ये सिगारेट ओढताना पकडण्यात आले आणि या विमानामधील क्रूच्या सूचनांचे पालन केले नाही, तर दुसर्या प्रवाशाने कथितरित्या सहकारी महिला प्रवासी जागेवर नसताना तिचं ब्लँकेट घेऊन दोन्ही जांगावर पाय पसरवत आराम केल्याची माहिती मिळाली आहे.
‘डीजीसीएने एअर इंडियाच्या जबाबदार व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती की त्यांच्या नियामक दायित्वांचे पालन न केल्याबद्दल अंमलबजावणी कारवाई का केली जाऊ नये. AI ने सोमवारी (23 जानेवारी) नोटीसला उत्तर सादर केले आणि त्याची तपासणी करण्यात आली. DGCA ला घटनेचा अहवाल न दिल्याबद्दल आणि त्याच्या अंतर्गत समितीकडे प्रकरणाचा संदर्भ देण्यास विलंब केल्याबद्दल AI वर 10 लाख रुपयांच्या आर्थिक दंडाच्या स्वरूपात अंमलबजावणी कारवाई लागू करण्यात आली आहे, जे लागू DGCA (नियमांचे) उल्लंघन आहे’, असे DGCAने एका निवेदनात म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात, DGCA ने AI विरुद्ध 26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद फ्लायरने एका महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याच्या कथित प्रकरणासाठी कारवाई केली होती.
डीजीसीएने AIला 30 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला होता; या प्रकरणी AI च्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसवर आणखी 3 लाख रुपयांचा दंड आणि या फ्लाइटच्या पायलट-इन-कमांडचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला.