एअर इंडियाने त्यांच्या कायमस्वरूपी ग्राऊंड स्टाफसाठी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजना जाहीर केली. एअर इंडियामध्ये किमान पाच वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱयांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि पाच वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱयांसाठी स्वैच्छिक पृथक्करण योजना (व्हीएसएस) आहे. विस्तारा सोबतच्या विलीनकरणाचा भाग म्हणून एअर इंडियाने हे पाऊल उचलले आहे.
कर्मचाऱयांना व्हीआरएस आणि व्हीएसएससाठी अर्ज करण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. अडीच वर्षांपूर्वी कंपनीचे खासगीकरण झाल्यानंतर तिसऱयांदा एअर इंडियाने आपल्या कायमस्वरूपी कर्मचाऱयांसाठी स्वेच्छिक स्वेच्छानिवृत्ती योजना आणली आहे.
2022 साली एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आली. एअर इंडिया आणि ‘विस्तारा’चे विलिनीकरण होणार आहे. याचा परिणाम दोन्ही एअरलाइन्सच्या थेट 600 कर्मचाऱयांवर होणार आहे. दोन्ही कंपन्यांची एकूण कर्मचारी संख्या 23 हजारांहून अधिक आहे. विलिनीकरणाची प्रक्रिया सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.