‘एअर इंडिया’ होणार खासगी कंपनी

604

‘एअर इंडिया’च्या सरकारी विमान कंपनीने खासगीकरणाच्या दिशेने उड्डाण केले आहे. ‘एअर इंडिया’तील आपली 100 टक्के भागीदारी सरकार विकणार असून, त्यासाठी 16 मार्चपर्यंत निविदा मागविल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यास एप्रिलमध्ये ‘एअर इंडिया’ खासगी कंपनी होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक योजनेअंतर्गत ‘एअर इंडिया’ आणि सहायक कंपनी ‘एअर इंडिया एक्प्रेस’मधील 100 टक्के हिश्श्याची विक्री केली जाणार आहे. सरकारने सोमवारी निविदा प्रक्रियेतील माहिती जाहीर केली. एअर इंडियातील इतर विभागांचे टप्प्याटप्प्याने खासगीकरण केले जाण्याची शक्यता आहे.

60 हजार कोटींवर कर्ज

  • 2018 मध्ये केंद्र सरकारने 76 टक्के भागीदारी विक्रीसाठी निविदा मागविल्या होत्या. मात्र यासाठी खरेदीदारांचा प्रतिसाद मिळाला नाही.
  • एअर इंडियावर 60 हजार कोटींचे कर्ज आहे. नव्या निविदा प्रक्रियेनुसार कर्जातील 23286 कोटी रुपयांची जबाबदारी खरेदीदार कंपनीला द्यावी लागेल. 2018 च्या प्रक्रियेत 33392 कोटी रुपयांच्या कर्जाची जबाबदारी खरेदीदार कंपनीवर होती.
  • 2018-19 मध्ये एअर इंडियाचा तोटा 8556 कोटी रुपये होता.

एअर इंडिया विकणे देशविरोधी; कोर्टात जाणार – डॉ. स्वामी

एअर इंडिया ही देशाची संपत्ती आहे. त्यामुळे एअर इंडियाचे खासगीकरण करणे देशविरोधी आहे. खासगीकरणाच्या या प्रक्रियेविरुद्ध न्यायालयात जाऊ, असा इशारा भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या