रेल्वे तिकिटापेक्षा कमी पैशात विमानातून करा प्रवास !

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम दर्जाच्या (फर्स्टक्लास) तिकिटापेक्षा कमी पैशात तिकीट खरेदी करुन विमान प्रवास करण्याची सुवर्णसंधी ‘एअर इंडिया’ने उपलब्ध करुन दिली आहे. येत्या शुक्रवारपासून ३० एप्रिलपर्यंत ही संधी उपलब्ध आहे. प्रवासाच्या २० दिवस आधीच कन्फर्म बुकिंग (तिकिटाचे आरक्षण) करणाऱ्यांना या संधीचा लाभ घेता येईल.

रेल्वेच्या राजधानी, दुरांतो, शताब्दी, डबलडेकर अशा स्वरुपाच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना तसेच इतर विमान कंपन्यांच्या जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘एअर इंडिया’ने स्वस्त विमान तिकिटाची ऑफर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

– See more at: https://www.saamana.com/desh-videsh/air-india-takes-on-rajdhani-express-in-fare-war#sthash.wuzKfcOb.dpuf

आपली प्रतिक्रिया द्या