Air Strike : पाकिस्तानच्या लढाऊ विमानांसदर्भात हवाई दल प्रमुखांचं मोठं विधान

bs-dhanoa

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या हवाई दलाकडून Air Strike करण्यात आला आणि बिथरलेल्या पाकिस्ताननं हिंदुस्थानच्या हवाईतळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या एकाही लढाऊ विमानानं नियंत्रण रेषा ओलांडलेली नव्हती, असं विधान हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेवेळी केलं. कारगिल युद्धाला 20 वर्ष झाल्यासंदर्भात एका विशेष कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एअर स्ट्राईकसंदर्भात प्रश्न विचारल्यावर बीएस धनोआ म्हणाले की, बालाकोट घटनेवेळी पाकिस्तानी हवाई दलाची विमानं आपल्या हवाई हद्दीत शिरली नव्हती. महत्वाची गोष्ट आहे की आपल्या लष्काराचा हेतू आणि त्यांचा हेतू काय होता? तो सिद्ध झाला का? तर आपल्याला बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे होते ते आपण केले. त्यांचा उद्देश होते की आपल्या लष्कराच्या तळास लक्ष्य करावे असे होते, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. हा त्याचा सार आहे. तुम्ही हे कसं केलं, किती आले, किती गेले, कसा प्रतिकार केला, यापेक्षा तुमचा हेतू होता तो साध्य झाला की नाही, हे तपासणं महत्वाचं आहे, असं धनोआ म्हणाले. तसंच पाकिस्तानचं एकही विमान नियंत्रण रेषा पार करून आपल्या हवाई हद्दीत आलं नव्हतं असं त्यांनी ठाम पणे सांगितलं.