एकदम झक्कास! ‘ही’ कंपनी देतेय रिचार्जवर 2 जीबी डाटा व 4 लाखांचा विमा

888

ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठई टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लान आणत असातात. त्यातच बाजारामध्ये जीओ आल्यानंतर तर ही स्पर्धा आणखी वाढली आहे. काही तरी नवीन देऊन ग्राहक कसा मिळवता येईल याकडे या टेलिकॉम कंपन्यांचे लक्ष असते. आता हेच पाहा ना एका कंपनीने ग्राहकांना रिचार्जसोबत विमाही देऊ केला आहे.

टेलिकॉम कंपीनी ‘एअरटेल’ने भारती एएक्सए लाईफ इन्श्यूरन्स सोबत भागिदारी केली आहे. यानंतर एअरटेलने नवीन प्रिपेड प्लानची घोषणा केली. या प्रिपेड प्लानमध्ये 599 च्या रिचार्जवर 2 जीबी डाटा, अनिलिमिटेड लोकल-एसटीडी कॉल, मेसेजेससह 4 लाख रुपयांचा विमाही मिळणार आहे. या प्लानची मुदत ही 84 दिवसांची असणार आहे. विशेष म्हणजे एअरटेलने 249 रुपयांच्या प्रिपेट प्लानसोबतही 4 लाखांचा विमा देऊ केला आहे.

रिचार्जसोबत विमा
एअरटेलच्या 499 च्या प्लानवर याआधी 2 जीबी डाटा मिळायचा. या प्लानची मुदत 81 दिवसांची होती. आता हा रिचार्ज 599 रुपयांचा करण्यात आला असून यासोबत ग्राहकांना विमा कवचही दिले आहे. प्रत्येक रिचार्जसोबत विमाचे हप्तेही कट होणार आहेत. विशेष म्हणजे हा विमा 18 ते 54 वयोगटातील कोणताही व्यक्ती घेऊन शकणार आहे. यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असणार नाही असे कंपनीने सांगितले आहे.

airtel1

रिचार्जनंतर विमानसाठी नोंद होईल आणि ग्राहकांना ऑनलाईन सर्टिफिकेट मिळेल. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना एक पेपरकॉपीही पाठवण्यात येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या हा प्लान तमिळनाडू आणि पुडुचेरी येथील ग्राहकांसाठी असून काही महिन्यात तो संपूर्ण देशात उपलब्ध असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या