वाह ! चक्क ३० जीबी इंटरनेट मोफत

23

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रिलायन्स जिओच्या फ्रि ऑफरनंतर मोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. एअरटेल कंपनीनंही ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी नवीन योजना आणली आहे. होळीच्या सणाचं औचित्य साधत कंपनीनं एक जबरदस्त ऑफर ग्राहकांना उपलब्ध करुण दिली आहे.

भारतीय एअरटेल कंपनीनं १३ तारखेला पोस्टपेड ग्राहकांसाठी खास योजना आणणार असल्याचं जाहिर केलं होतं. कंपनीनं पोस्टपेड ग्राहकांसाठी मायएअरटेल अॅपवर खास ऑफर दिली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकाला ३० जीबी इंटरनेट डाटा फ्रिमध्ये मिळणार आहे.

एअरटेलच्या या खास ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला मायएअरटेल अॅपमध्ये जावं लागेल. तिथं गेल्यावर ‘क्लेम फ्रि डाटा ऑफर’ यावर क्लिक करायचं आहे, मात्र ही ऑफर फक्त पोस्टपेड ग्राहकांसाठी असणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या